तंत्रज्ञाना तील जीवन

मनापासून....2 

 तंत्रज्ञानाने संपुर्ण जगाची दशा आणि दिशा पुर्ण पणे बदलली आहे. तंत्रज्ञान चांगले कि वाईट अशी चर्चा जी गेल्या दशकात सतत सुरू होती तीचा मागमूस देखिल उरला नाही ह्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यात. आता तर तंत्रज्ञान कसे आवश्यक आहे आणि ते कसे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आवश्यक आहे नव्हे त्या शिवाय गोष्टी पुढे जाणारच नाहीत अशी काहीशी जगाची स्थिती झाली आहे . आताशा तर एखाद्या घटने मधे जर तंत्रज्ञान उपलब्ध असतांना त्याची मदत घेतली नाही म्हणुन एकतर संशय वाढतो किंवा संबधीत व्यक्ती ला किंवा संस्थेला प्रतिगामी ठरवल्या जाते. अशा पद्धतीने संपुर्ण जगाच्या जीवनात तंत्रज्ञानाने आपला सहभाग नोंदवला आहे.
ह्या मागे अर्थातच संपुर्ण जगातील शास्रज्ञांनी आपापल्या ज्ञान विज्ञानाची आहुती दिली आहे. आणि जगाने आनंदाने बाहु पसरून तंत्रज्ञानाचे स्वागत केले आहे. जे चांगलेच आहे.विचार देखील करवत नाही कि कोवीड-19मुळे ज्या लाॅकडाऊन मधुन जवळपास सगळे जग गेले त्या काळात जर स्मार्ट फोन नसते किवा स्मार्ट फोन असुनही त्या मधे 4G नसते तर घरा मधे बंदिस्त राहणं सोप झाल असत का निदान शहरी आणि निमशहरी भागात तरी . आजकाल तर खेड्यापाड्यातील गृहिणी मिक्सर, आटाचक्की , इस्त्री, ताक घुसळायला ब्लेंडर इत्यादी अनेक गोष्टी सहज वापरतात. एवढेच नाही तर पापड - शेवया तयार करण्याच्या मशीन जवळपास प्रत्येक खेड्यातून निदान एखादी तरी जरूर सापडते. काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धती आज खेड्यापाड्यातही रूढ झाली. चांगली किंवा वाईट हा मुद्दा नाही. काही गोष्टी काळानुरुप घडत असतात त्या साठी उगाचच तक्रारीचा सुर लावणे ठिक नाही. तर अशा विभक्त कुटुंबातील गृहिणीला अगदी अष्टभुजा करून टाकलं आहे तंत्रज्ञानाने. आता तर खेड्यातुन ही गृहिणी, तरूण मुली स्मार्ट फोन वापरून व्यावसायीक बनल्या फावल्या वेळ सत्कारणी लावुन. 
सकाळी जागे झाल्या पासुन तर झोपे पर्यंत क्वचितच असे काम असेल ज्यात आपण एखादे छोट का होईना तंत्रज्ञानाची मदत घेत नाही. त्यामुळे भारताने जे नवीन शैक्षणीक धोरण जाहीर केले त्या मधे आधुनिक तंत्रज्ञाना ला महत्वाचे स्थान दिले आहे. जे खूप महत्वाचे पाऊल ठरणार आहे पुढील पिढीला जीवनमान आणखी उंचावर नेण्यासाठी. 
      ज्योती देशमुख इंगळे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

उपासना ....

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा