मनापासून
सुशांत सिंह राजपुत ह्याच्या आकस्मिक मृत्युचे प्रकरण सद्या चांगलेच गाजते आहे. काय खरे काय खोटे ते तपासाअंती बाहेर येईलच.पण त्या पासुन आजच्या तरुणाइने बोध घेणं गरजेचे आहे.कदाचित मुला-मुलींना हे पटणार नाही पण एखादी कल्पना आपल्याला पटली नाही म्हणजे ती चुकिची आहे असे नसते.तर मुला -मुलींनी अगदी जवळचे मित्र किंवा मैत्रीण निवडतांना त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा अंदाज घेणं आवश्यक आहे.आताच्या काळात ते कठीण नाही. वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ने ते बरचस सोप केले आहे. पुर्ण नाही तरी एकंदर स्वभावाचा थोडाफार तरी अंदाज येतो. अर्थात एखाद्या ने किंवा एखादी ने खूप काळजीपुर्वक विचार करून ठरवुन स्वतः ची वेगळी च प्रतीमा माध्यमातून बनवली तर ....हा देखील धोका आहेच आणि असे बरेचदा घडलेले हि आहे.तरीही स्वभावाची पुर्ण खात्री झाल्याशिवाय आपल्या अगदी जवळच्या परीघात घेऊ नये. काहीही झालं तरी आपल्या आर्थिक किंवा इतर व्यावसायिक, व्यावहारीक गोष्टी, कृती दुसर्या कुणावर सर्वस्वी सोपवु नये. हे अर्थातच सर्वांना चांगले च ठाऊक असते.पण खूप मुल-मुली भावनेच्या ओघात वहावत जातात . नंतर आपण एवढा किंवा एवढी हुशार बुद्धीमान असुनही असे कसे वागले. तेच तर वैशिष्ट्य आहे भावनांच्या आवेगाचे . तो एवढ्या ताकदीचा होतो कि शहाणपण,सुचकता , आईवडिलांची माया, वात्सल्य भावंडाचे प्रेम सगळ काही थीट पडत. त्यासाठी घरच्यांनीही काही गोष्टींची काळजी घेण आवश्यक आहे. मुलांना घरचे प्रेमाचे, मायेचे ,समजून घेऊन सोबत असण्याचे आश्वासन असणे गरजेचे आहे. सुशांत सिंह खूप समजूतदार असुनही अडकला जाळ्यात. कारण त्याचा अती चांगुलपणा, हळवेपणा . प्रत्येक वेळी क्षणभर थांबून विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. अशी सावध सवय जर मनाला लावणे अशक्य नाही. आपण कित्येक बाबतीत खूप सजग असतो बाहेर जातांना कुलुप दोन वेळा ओढुन बघतो.विजेची बटणं बंद आहेत ना हे तपासतो हे आपण सवयीने करतो म्हणुन हे विशेष वाटत नाही. पण हि सुद्धा आपण आपल्या वागण्याला लावलेली एक प्रकारची छोटीशी पण तरीही अतिशय महत्वाची अशी शिस्त आहे . अशीच शिस्त आपण आपल्या भावनांना लावणे आवश्यक आहे. सुरुवातीला जड जाऊ शकत पण कठीण नाही. भावभावनांचे नियोजन मानव अगदी संस्कृतीच्या सुरूवातीच्या काळापासुन करत आला आहे. अलीकडे जसजशी आर्थिक सुबत्ता आली आहे जी अत्यंत चांगली गोष्ट झाली आहे पण त्यामुळे च कि काय थोडासा बेसावध पणा आला आहे.सजगता कमी झाली आहे. भावनाशील असने चांगले आहे. भावनाविवश होणं तितकस योग्य नाही. असे मला वाटते. संयम आणि धीर व्यक्तीमत्वा चे अतीशय आवश्यक अंग आहेत.ह्या गुणांचा सतत वापर कराण्याची मनाला शिस्त लावणे आवश्यक आहे.
ज्योती देशमुख इंगळे
Comments
Post a Comment