ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ||
काय भुलालाही वरलीया रंगा ||
कमान ढोंगी परी तीर नोहे डोंगा||
काय भुललासी वरलीया रंगा ||
नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे ||
काय भुलालाही वरलीया रंगा ||
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा ||
काय भुलालाही वरलीया रंगा||
डोंगा = वाकडा
संत चोखामेळा
आज हा अभंग अर्था सहीत वाचायला मिळाला .
खूप छान वाटले वाचून . आपले संत महान विचारवंत होते . कोणत्याही नामांकित विद्यापीठात तत्वज्ञान किंवा मानसशास्त्राचा अभ्यास न करता ही सामान्य जन मानसिकतेची सखोल जाण असलेले. सगळ्या संतांचे एक एक अभंग मानसशास्त्राचा आणि तत्वज्ञानाचा एक एक अध्याय च जणु.खरच आपण किती चटकण कुणालाही लेबल लावतो . आपण लावलेले लेबल हे जणु काही आपण समोरच्या व्यक्तीला स्कॅन करून क्षणार्धात त्या व्यक्तीच्या मनात खोलवर उडी मारून काढून आणलेला त्या व्यक्तीच्या अंतर्मनातील गाभा च आहे .अशा आविर्भावात सगळ्यांना त्या व्यक्तीच्या संदर्भातील आपणच आपल्या मनाने काढून ठेवलेले आपले स्वतःचे त्या त्या व्यक्ती बद्दल चे आपलेच इवलेसे मत असते .हे पण आपल्या ला ओळखता येत नाही.कुणाच्या अंतर्मनाचा ठाव घेणं हे तर अतिशय सबुरीच , स्थिर मन ठेऊन करण्याची गोष्ट आहे . त्यामुळे अंतर्मनाचा ठाव घेणं हे तर सोडाच पण आपण कुणाच्या मनाचा वरवरच्या पापुद्र्या पर्यंत हि पोहचण्याची तोशीस करत नाही. आणि मजा म्हणजे आपण स्वतः मात्र स्वतः ची च पाठराखण करत रहातो कि आपण किती माणसं पारखण्यात पटाईत, सुतावरुन स्वर्ग गाठतो वगैरे. हे च स्वतः घ्या बाबतीत अगदी उलट असतो आपला नियम . कैलाश खेर च्या गाण्यातील एक ओळ खूप सुरेख आहे ."दुनिया बनाई मैने हाथोसे मिट्टी से नहीं जज्बातो से." हे विश्व निर्माण करणारा कबुली देत आहे कि मी विश्वाची निर्मिती करतांना मातीचा नाही तर व्यक्ती च्या भाव भावनेचा, मनातील निर निराळ्या तरंगांचा वापर केला आहे.आणखी काय पाहिजे साक्षी आणि पुरावे. आणि किती खरे आहे ते उगाच नाही आपल्या कडे म्हण आहे."जे पिंडी तेच ब्रम्हांडी.'' वेळोवेळी थक्क होत रहायचं विश्वाचा पसारा पहाताना, एवढं मोठं घबाड निर्मित्याने आपल्या समोर मांडुंन ठेवलेल असतांना का आपण आपल्या च् सारख्या सामान्य लोकांच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याचा तोकडा ,पोकळ, आणि विशेष म्हणजे सपशेल चुकीचा प्रयत्न करत रहातो. मानवाला जात्याच महान बनण्याची हाव आहे. काहीही मोठ , महत्त्वाचे काम न करता आपल्या ला लोकांनी महत्वाचे समजाव ,आपली मजल दुरवरची नसते , तेवढी आपली कुवत ही नसते तर आपल्या च् आजुबाजुला असलेले आपल्या पेक्षा थोडेसे वेगळे असलेले कुणा पेक्षा कमी किंवा जास्त नाही तर वेगळे असलेले लोक निवडून त्यांच्या गळ्यावर पाय देऊन मोठं होण्याचा वांझोटा प्रयत्न सतत सतत करत रहातो.विश्व निर्मात्यांनी आधीच कबुली दिली आहे कि विश्व निर्माण करतांना त्यांनी कोणता कच्चा माल वापरला . सगळे च जर ज्ञानी झाले तर सामान्य कोण असेल.
Comments
Post a Comment