Posts

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ||  काय भुलालाही वरलीया रंगा ||  कमान ढोंगी परी तीर नोहे डोंगा|| काय भुललासी वरलीया रंगा || नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे || काय भुलालाही वरलीया रंगा || चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा || काय भुलालाही वरलीया रंगा||  डोंगा = वाकडा  संत चोखामेळा आज हा अभंग अर्था सहीत वाचायला मिळाला . खूप छान वाटले वाचून . आपले संत महान विचारवंत होते . कोणत्याही नामांकित विद्यापीठात तत्वज्ञान किंवा मानसशास्त्राचा अभ्यास न करता ही सामान्य जन मानसिकतेची सखोल जाण असलेले. सगळ्या संतांचे एक एक अभंग मानसशास्त्राचा आणि तत्वज्ञानाचा एक एक अध्याय च जणु.खरच आपण किती चटकण कुणालाही लेबल लावतो . आपण लावलेले लेबल हे जणु काही आपण समोरच्या व्यक्तीला स्कॅन करून क्षणार्धात त्या व्यक्तीच्या मनात खोलवर उडी मारून काढून आणलेला त्या व्यक्तीच्या अंतर्मनातील गाभा च आहे .अशा आविर्भावात सगळ्यांना त्या व्यक्तीच्या संदर्भातील आपणच आपल्या मनाने काढून ठेवलेले आपले स्वतःचे त्या त्या व्यक्ती बद्दल चे आपलेच इवलेसे मत असते .हे पण आपल्या ला ओळखता येत नाही.कुणाच्या अंतर्मनाचा ठाव घेणं हे तर अतिशय सबुरीच , स्थिर मन ठेऊन

उपासना ....

उपासना  कशी करावी किवा काय करावे म्हणजे व्यक्ती खूप भाविक ठरेल. ह्याचे काही साचेबद्ध नियम नाहीत . प्रत्येक व्यक्ती ची उपासना  करण्याची आपापली पद्धत असते जी त्या त्या व्यक्ती ने स्वतः जोपासली वाढवली आणि स्वतः पुरती मर्यादित असुन स्थिर केलेली असते . त्यामुळे च अमुक एकाच पद्धतीने उपासना किंवा उपासना  सिद्ध होते असे म्हणता येणार नाही. कुणी कशा पद्धतीने भक्ती करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. किंवा नसेलही जरी कुणी भाविक मनाचा तर त्यामुळे ती व्यक्ती वाईट ठरत नाही. भाविक असणे म्हणजे सुचारीत्र्याचे प्रमाण पत्र नक्की च नाही. कुणी काय खावे किंवा न खावे ह्याचा त्या व्यक्ती च्या भाविकतेशी संबंध निश्चित च नाही.  पण हिंदु आध्यात्म आत्मसात करणारे लोक बहुतांशी शुद्ध शाकाहारी होतात. अगदी सरसकट शंभर टक्के नाही तरी बहुतांशी होतात हे खर आहे .पण ते आध्यात्मिक उच्च पातळीवर असतांना होत असावे कारण हिंदु अध्यात्म सहसा आपल्या आत डोकावून बघायला सांगत असते. त्यामुळे होते हे कि प्रत्येक  सजीवाचा विचार करतांना आधी स्व भावना ताडुन पाहिल्या जाते उदाहरणार्थ, माझे बोट कापले किंवा चटका बसला तर मला किती त्रास होतो तसाच

तंत्रज्ञाना तील जीवन

मनापासून....2   तंत्रज्ञानाने संपुर्ण जगाची दशा आणि दिशा पुर्ण पणे बदलली आहे. तंत्रज्ञान चांगले कि वाईट अशी चर्चा जी गेल्या दशकात सतत सुरू होती तीचा मागमूस देखिल उरला नाही ह्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यात. आता तर तंत्रज्ञान कसे आवश्यक आहे आणि ते कसे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आवश्यक आहे नव्हे त्या शिवाय गोष्टी पुढे जाणारच नाहीत अशी काहीशी जगाची स्थिती झाली आहे . आताशा तर एखाद्या घटने मधे जर तंत्रज्ञान उपलब्ध असतांना त्याची मदत घेतली नाही म्हणुन एकतर संशय वाढतो किंवा संबधीत व्यक्ती ला किंवा संस्थेला प्रतिगामी ठरवल्या जाते. अशा पद्धतीने संपुर्ण जगाच्या जीवनात तंत्रज्ञानाने आपला सहभाग नोंदवला आहे. ह्या मागे अर्थातच संपुर्ण जगातील शास्रज्ञांनी आपापल्या ज्ञान विज्ञानाची आहुती दिली आहे. आणि जगाने आनंदाने बाहु पसरून तंत्रज्ञानाचे स्वागत केले आहे. जे चांगलेच आहे.विचार देखील करवत नाही कि कोवीड-19मुळे ज्या लाॅकडाऊन मधुन जवळपास सगळे जग गेले त्या काळात जर स्मार्ट फोन नसते किवा स्मार्ट फोन असुनही त्या मधे 4G नसते तर घरा मधे बंदिस्त राहणं सोप झाल असत का निदान शहरी आणि निमशहरी भागात तरी . आजकाल तर खेड्

मनापासून

सुशांत सिंह राजपुत ह्याच्या आकस्मिक मृत्युचे प्रकरण सद्या चांगलेच गाजते आहे. काय खरे काय खोटे ते तपासाअंती बाहेर येईलच.पण त्या पासुन आजच्या तरुणाइने बोध घेणं गरजेचे आहे.कदाचित मुला-मुलींना हे पटणार नाही पण एखादी कल्पना आपल्याला पटली नाही म्हणजे ती चुकिची आहे असे नसते.तर मुला -मुलींनी अगदी जवळचे मित्र किंवा मैत्रीण निवडतांना त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा अंदाज घेणं आवश्यक आहे.आताच्या काळात ते कठीण नाही. वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ने ते बरचस सोप केले आहे. पुर्ण नाही तरी एकंदर स्वभावाचा थोडाफार तरी अंदाज येतो. अर्थात एखाद्या ने किंवा एखादी ने खूप काळजीपुर्वक विचार करून ठरवुन स्वतः ची वेगळी च प्रतीमा माध्यमातून बनवली तर ....हा देखील धोका आहेच आणि असे बरेचदा घडलेले हि आहे.तरीही स्वभावाची पुर्ण खात्री झाल्याशिवाय आपल्या अगदी जवळच्या परीघात घेऊ नये. काहीही झालं तरी आपल्या आर्थिक किंवा इतर व्यावसायिक, व्यावहारीक गोष्टी, कृती दुसर्या कुणावर सर्वस्वी सोपवु नये. हे अर्थातच सर्वांना चांगले च ठाऊक असते.पण खूप मुल-मुली भावनेच्या ओघात वहावत जातात . नंतर आपण एवढा किंवा एवढी हुशार बुद्धीमान